Dinesh Agarwal : काँग्रेसने 'स्टार प्रचारक' बनवलं तरीही भाजपमध्ये जाणारे दिनेश अग्रवाल आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

उत्तराखंड लोकसभा निवडणुकीपूर्वी दिनेश अग्रवाल यांच्या रूपाने उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे माजी कॅबिनेटमंत्री दिनेश अग्रवाल यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

दिनेश अग्रवाल हे हरीश रावत यांच्या जवळचे मानले जातात.

दिनेश अग्रवाल यांनी विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा पराभव केला होता.

हरीश रावत सरकारमध्ये ते तीन वेळा आमदार आणि वनमंत्री होते

दिनेश अग्रवाल यांनी 1993 आणि 1996 मध्ये डेहराडून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

2002 आणि 2007 मध्ये त्यांनी लक्ष्मण चौक मतदारसंघातून नित्यानंद स्वामी यांचा सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव केला

2012 मध्ये धरमपूर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश ध्यानी यांचा पराभव करून ते आमदार झाले होते.

मागील काही दिवसांपासून त्यांची नाराजी उघडपणे दिसत होती. काँग्रेस वरिष्ठांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Next : काँग्रेस आमदाराच्या पतीवर घर सोडण्याची वेळ; कोण आहे मुंजारे

Anubha Munjare, Kankar Munjare | Sarkarnama
येथे पाहा