Vijaykumar Dudhale
माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीमध्ये डावलण्यात आल्याने मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजमधील ‘शिवरत्न’ बंगल्यावर माढा मतदारसंघातील महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.
अकलूजमधील बैठकीला खुद्द विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते. तसेच, लोकसभेसाठी इच्छूक धैर्यशील मोहिते पाटील यांनी पाहुण्याचे स्वागत केले.
मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. याच बैठकीनंतर त्यांनी अकलूजची माती ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आहे, त्यामुळे येत्या दहा दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असे भाकीत केले आहे.
फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण हे अकलूजमधील बैठकीला उपस्थित होते. चव्हाण हे फलटणमधून 2009 पासून विधानसभेला निवडून येत आहेत.
करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हेही अकलूजमधील बैठकीला उपस्थित होते. खरं तर नारायण पाटील यांनाही शरद पवार यांच्याकडून भेटीचे निमंत्रण आलेले आहे. त्यांना लोकसभा उमेदवारीची ऑफर शरद पवार यांच्या पक्षाकडून देण्यात आलेली आहे.
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हेही शिवरत्नवरील बैठकीला आले होते. मध्यंतरी त्यांनी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले हेाते
सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू आणि महाराष्ट्र पुरोमागी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते. त्यांनी सांगोल्यातून विधानसभा लढविण्याची जोरदार तयारी केलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू डॉ. अनिकेत देशमुख हेही आले होते.
निवडणुकीत आयोगानं नेत्यांना घातल्या 'या' मर्यादा