Mayur Ratnaparkhe
1878 - स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते, देशाचे माजी गव्हर्नर जनरल, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म. त्यांनी रामायण, महाभारत या ग्रंथांचे तमिळ व इंग्रजीत भाषांतर केले. त्यांतील तमीळ भाषांतराला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
1942 - महायुद्धकाळात चीनमध्ये जाऊन मदतकार्य करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन.
1998 - अर्थशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान. या विषयासाठी प्रा. सेन यांच्या रूपाने आशिया खंडाला प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे.
2000 - रक्तजनक स्तंभ पेशींची (हिमेटोपॉयेटिक स्टेम सेल) देशातील पहिली बॅंक पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) सुरू . रक्ताचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, अस्थिमज्जेचे विकार आदींच्या रुग्णांना या बॅंकेचा लाभ होऊ शकणार आहे.
2003 - नामवंत संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन. संगीताबरोबरच चित्रकला, व्यंगचित्रकला, वादनकला, होमिओपॅथी आदी क्षेत्रांतही त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यांची विशिष्ट शैलीतील चित्रपट परीक्षणेही आवडीने वाचली जात. श्रीकांत ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे वडील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू होत
2004 - भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आद्य नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे व कॉ. ए. के. गोपालन आणि समाजवादी नेते आचार्य नरेंद्र देव यांच्या पुतळ्यांचे संसद भवनात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
2004 - केनियाच्या पर्यावरणवादी नेत्या वंगारी मथाई यांना शांततेचे "नोबेल' पारितोषिक प्रदान करण्यात आले.
2006 ः कल्पना चावलापाठोपाठ सुनीता विल्यम्स अंतराळात भरारी घेणारी भारतीय वंशाची दुसरी महिला ठरली.