Roshan More
संजय मल्होत्रा IAS अधिकारी आहेत. त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार होता. त्यांची आरबीआय गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 बॅचचे IAS अधिकारी आहेत.
मल्होत्रा हे आयआयटी-कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत तेथून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे.
अमेरिकेच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक पाॅलिसीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रज्युएशन केले आहे.
संजय मल्होत्रा यांना प्रशासकीय सेवेत 33 वर्षांचा अनुभव आहेत. त्यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान आदी विभागांमध्ये का केले आहे.
केंद्र सरकारच्या कर ठरवण्याच्या धोरणात संजय मल्होत्रा यांचा सहभाग राहिला आहे.
शशिकांत दास हे आरबीआयचे 25 वे गव्हर्नर होते. तर संजय मल्होत्रा हे आरबीआयचे 26 गव्हर्नर ठरणार आहेत.