Rashmi Mane
1740 - मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती चिमाजीअप्पा यांचे निधन. त्यांनी मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगिजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले. साष्टी बेट म्हणजे सध्याचा मुंबई उपनगर विभाग.
1903 - ऑलिव्हर राईट व विल्बर राईट या बंधूंनी अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना प्रांतातील किटीहॉक येथे विमानोड्डाणाचा यशस्वी प्रयोग केला. आधुनिक विमानयुगाची ही सुरवात मानली जाते.
1927 - हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.
1959 - ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि इतिहासकार डॉ. पट्टाभिसितारामय्या यांचे निधन. कॉंग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला "हिस्टरी ऑफ द इंडियन नॅशनल कॉंग्रेस' (दोन खंड) हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
1965 - भारताचे सहावे लष्कर प्रमुख जनरल के. एस. थिमय्या यांचे निधन
1971 - बांग्लादेश मुक्तीसाठी झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अखेर पाकिस्तानचे अध्यक्ष याह्याखान यांनी मान्य केली.
1999 - भविष्य निर्वाह निधी योजनेला ग्राहक संरक्षण कायदा लागू होत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.