सरकारनामा ब्यूरो
महायुती सरकारच्या मंत्र्यानी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीने EVM विरोधात अंदोलन केले.
यावेळी "EVM हटाव देश बचाव","EVM हटाव लोकशाही बचाव", असे नारे देण्यात आले आहेत.
यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, संभाजीनगरचे आमदार अंबासाहेब दानवे, नाना पटोले, भाई जगताप आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
यात नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे EVM मशीन विरोधातील फ्लेक्स आणि पोस्टर घेऊन आंदोलन करत न्यायाची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा 2024 च्या धक्कदायक निकालावरुन EVM ला महाविकास आघाडीने कडाडून विरोध सुरु केला आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारीही त्यांनी दाखवली.
जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा दावा देखील केला होता. ECILही भारत सरकारची कंपनी आहे. ही कंपनी निवडणुक आयोगासाठी EVM बनवण्याचे काम करते.ECIL ही VVPAT मध्ये लागणाऱ्या SLU SYMBOL LOADING UNIT द्ववारे मशीन हॅक करु शकते.
महाविकास आघाडीच्या नेत्याने EVM विरोधात आंदोलन करत महायुती सरकारवर सडकून टिक करत EVM मशीनवरील संशय दुर करण्यासाठी सरकारने बॅलेट पेपर वर निवडणूका घ्यावी अशी मागणी केली.