Rashmi Mane
1927 - राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशी दिली
1934 - भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म
1941 - अॅडाॅल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले
1963 - झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य बहाल
1971 - बांग्लादेश मुक्तीच्या युद्धात भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर अखेर पाकिस्तानचे अध्यक्ष याह्याखान यांच्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर
1983 - संपूर्ण देशी बनावटीच्या 'विक्रम' या तटरक्षक दलासाठीच्या नौकेचे तत्कालिन संरक्षण मंत्री आर. वेंकटरमण यांच्या हस्ते अनावरण
1997 - स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेंद्र बारलिंगे यांचे निधन