सरकारनामा ब्यूरो
काल संसदेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
संविधानावर बोलत असताना अमित शाह आंबेडकरांविषयी म्हणाले होते की, आजकाल फॅशन झाली आहे, आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर. एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्गात स्थान मिळाले असते.
या विधाना विरोधात INDIA आघाडीच्या नेत्यांनी संसदेच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पोस्टर हाती घेत अमित शाह यांच्या निदर्शने केली.
यावरुन काँग्रेसने आज भाजप 'आरएसएस'चे विचार हे दलित लोकांबाबत निराशाजनक, घृणास्पद असल्याच म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा गुन्हा आहे. यांच्याबद्दल अमित शाह आणि भाजपने संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली.
यावेळी INDIA आघाडीच्या नेत्यांनी, खासदारांनी 'जय भीम'अशा घोषणाही दिल्या.
यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस व इतर पक्षांचे नेते सहभागी होते.
अमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यसभेत विरोधकांच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहांची पाठराखन करत यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले.
अमित शहा यांनी राज्यसभेत आंबेडकरांचा अपमान करण्याचा काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला. 'काँग्रेस आणि त्यांच्या कुजलेल्या इकोसिस्टमला असे वाटत असेल की त्यांच्या दुर्भावनापूर्ण खोट्यामुळे त्यांचे अनेक वर्षांचे दुष्कृत्य, विशेषत: डॉ. आंबेडकरांबद्दलचा त्यांचा अनादर लपवू शकतो, तर त्यांची घोर चूक आहे!'