Dinvishesh 20 January : काय घडलं होतं, त्यावर्षी आजच्या दिवशी? ; वाचा आजचा दिनविशेष

Mayur Ratnaparkhe

1871 - भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापडगिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती सर रतनजी जमशेटजी टाटा यांचा जन्म.

1930 - क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन.

1948 - महात्मा गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला. सायंप्रार्थना भाषणाच्या वेळी बाँबस्फोट.

1998 - संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांना जाहीर.

1999 - साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांना जाहीर.

2001 - अमेरिकेचे त्रेचाळिसावे अध्यक्ष म्हणून जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी पदभार स्वीकारला.

2002 - रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग (रॉ) या भारताच्या परराष्ट्र गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आर. एन. काओ यांचे निधन. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.

2003 - "इन्फोसिस टेक्‍नॉलॉजीज'ला 2003 ची सर्वांत आदरणीय कंपनी असा पुरस्कार उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते देण्यात आला.

२००९ : अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘ब्राह्मोस’ या स्वनातीत क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.

Next : परीक्षेच्या आदल्यादिवशी रात्री पॅनिक अ‍ॅटक; हार न मानता अखेरच्या प्रयत्नात UPSCमध्ये बाजी मारली

Girisha Chaudhary | Sarkarnama
येथे पाहा