सरकारनामा ब्यूरो
जर एखादं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर ते मिळतचं अस म्हणले जाते याचचं उत्तम उदाहरण आहेत गिरिशा चौधरी याचं.
हरियाणाच्या गिरिशा यांचं प्राथमिक शिक्षण कर्नाल येथून झालं. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेकची डिग्री मिळवली.
गिरिशा यांच पत्रकार बनण्याचे स्वप्न होतं, मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला पाठिंबा दिला नाही.
डिग्री घेतल्यानंतर गिरिशा यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र, त्या समाधानी नव्हत्या.
2018 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा देण्याचे ठरवत परीक्षेची तयारी सुरु केली. 2019 ला त्यांनी पहिली परीक्षा दिली पण त्यांना प्रिलिम्सही पास करता आली नाही.
न हार मानता त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. मात्र तिन्ही प्रयत्नात अपयश आल्याने त्या खूप घाबरल्या. 2021 मध्ये चौथ्या वेळेला सर्व काही विसरून त्यांनी पुन्हा यूपीएससीची तयारी सुरु केली.
प्रिलिम्स परीक्षेच्या तयारी वेळी त्यांना आदल्या रात्री पॅनिक अटॅक आला. त्यामुळे त्या परीक्षा देऊ शकल्या नाहीत.
यातून सावरत त्यांनी 2022 ला पाचव्यांदा हरियाणा लोकसेवा (HPSC) आयोगाची परीक्षा दिली. प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही परीक्षेत त्यांना यश मिळाले.
UPSC च्या अखेरच्या प्रयत्नात गिरिशा यांनी 263 वी रँक मिळवत कमाल केली. सध्या त्या महसूल सेवेत कार्यरत आहेत.