Rashmi Mane
1524 - प्रसिद्ध पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन. त्याने आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे येण्याचा मार्ग शोधल्याने जगाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली.
1899 - नामवंत मराठी लेखक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म. त्यांनी पन्नासांहून अधिक पुस्तके लिहिली असून त्यातील अनेक पुस्तकांच्या लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. त्यांचे "श्यामची आई' हे पुस्तक प्रकाशनातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
1910 - ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा सुनावल
1924 - प्रसिद्ध पार्श्वगायक महंमद रफी यांचा जन्म. त्यांनी हिंदी व उर्दू या भाषांव्यतिरिक्त जवळजवळ सर्व प्रचलित भाषांमधून गाणी गायिली. 1967 मध्ये त्यांना "पद्मश्री' पुरस्काराने गौरविले होते.
1987 - तामीळनाडूचे ३ रे मुख्यमंत्री अभिनेते भारतरत्न एम. जी. रामचंद्रन यांचे निधन
1996 - आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात हवाई दलाचे विमान कोसळून २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू
1999 - इंडियन एअरलाइन्सचे काठमांडूहून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानाचे अज्ञात चाच्यांकडून अपहरण. प्रवाशांच्या सुटकेसाठी भारत सरकारला मौलाना मसूद अझर, ओमर शेख आणि मुश्ताक झरगर या तीन कडव्या अतिरेक्यांची सुटका करावी लागली
2000 - जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत स्पेनच्या अॅलेक्सी शिराॅवरचा पराभव करुन भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद जगज्जेता बनला
2014 - थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) आणि आपल्या अमोघ वाणीने भारतीय मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ नेते, अजातशत्रू आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर.