Dinvishesh 25 November : सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास प्रारंभ ; यशवंतराव चव्हाण यांचे निधन, अन्...

Mayur Ratnaparkhe

मांसाहार वर्ज्य दिन । International Day for the Elimination of Violence against Women(UN)

25 November 2024 | Sarkarnama

1664 : शिवाजी महाराजांनी मालवणजवळ सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधण्यास प्रारंभ केला. या किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच शह बसला.

25 November 1664 | Sarkarnama

1962 : आधुनिक काळातील संतकवी दासगणू महाराज यांचे निधन. त्यांचे मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे. "भक्तिरसामृत', "भक्तलीलामृत' व "संतकथामृत' हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. त्यांनी लिहिलेले गजानन महाराजांचे चरित्र प्रसिद्ध आहे.

25 November 1962 | Sarkarnama

1984 : भारताचे माजी उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मानले जाणारे यशवंतराव चव्हाण यांचे निधन.

25 November 1984 | Sarkarnama

1997 : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व दैनिक लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांचे निधन.

25 November 1997 | Sarkarnama

1999 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

25 November 1999 | Sarkarnama

2002 : सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या अतिरिक्त महासंचालकपदी एअर व्हाईस मार्शल श्रीमती पी. बंदोपाध्याय यांची नियुक्ती. एअर व्हाईस मार्शल या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

25 November 2002 | Sarkarnama

NEXT : महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर पहिली पत्रकार परिषद

येथे पाहा