Deepak Kulkarni
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक अनपेक्षित निकालानंतर त्या दिवसभर कोणतीही भूमिका मांडली नव्हती. त्यामुळे शरद पवार काय बोलणार? याची उत्सुकता होती. अखेर शरद पवारांनी कराड येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे.
विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर पहिली पत्रकार परिषद,शरद पवारांनी 'ही' 10 मोठी विधानं केली आहेत.
“आमची जी अपेक्षा होती, तसा हा निर्णय नाही. शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे.
ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. मी त्यावर भाष्य करणार नाही.
‘काल निकाल लागला, आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही.
आमच्यातून बाहेर गेलेल्यांना या निवडणुकीत चांगले यश मिळाले. अजित पवार यांच्या पक्षाला यश मिळाले.
निवडणुकीतील एकंदरीत आकडेवारी बघता महायुतीमध्ये कसली नाराजी असेल असं वाटत नाही.
बारामती विधानसभेच्या निवडणूक रिंगणात युगेंद्र पवार यांना उतरवणे हे चुकीचे नव्हते. अजित पवार व युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही.
या निवडणुकीत महिलांचे मतदान वाढले आहे, असे आकडेवारीवरुन दिसत आहे. तो फायदा महायुतीला मिळाल्याचे पवार यांनी सांगितले
‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. त्याचा फायदा या विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला, असंही शरद पवार यांनी म्हटलं.