सरकारनामा ब्यूरो
'भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.
1954 पासून भारतात 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
भारतरत्न हा पुरस्कार देशासाठी केलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी सन्मानित केला जातो. क्रिडा क्षेत्र, कलाकार मंडळी. राजकीय नेते, अधिकारी यांना सन्मानित करतात.
भारतरत्न हा पुरस्कार देण्यासाठी पंतप्रधान हे नेत्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींना करतात.
यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
लालकृष्ण अडवाणी यांना 2024 मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून भारतरत्न प्रदान करण्यात आला. 2015 मध्ये, त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मानही देण्यात आला आहे.
जुलै 1979 आणि जानेवारी 1980 भारताचे 5 वे पंतप्रधान असलेले चौधरी किरण सिंह यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
1991 ते 1996 या काळात भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, संरक्षण, गृह व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार अशा पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2024 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानित जाहीर करण्यात आला.
भारतात हरित क्रांती घडवणारे एम.एस.स्वामिनाथन यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.