Dinvishesh 6 January : का महत्त्वाचा आहे 6 जानेवारी हा दिवस, नेमकं काय काय घडलं होतं?

Mayur Ratnaparkhe

1673- कोंडाची फर्जंद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले

1832 - या दिवशी मुंबईत "दर्पण' या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. दर्पण हे साप्ताहिक वृत्तपत्र होते. बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक होते.

1838 - सॅम्युअल माॅर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला

1868 - आधुनिक मराठी संतकवी दासगणू यांचा जन्म नगर जिल्ह्यातील अकोळनेर या गावी झाला. त्यांचे मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे असे होते.

1924 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकारणात भाग न घेणे या अटीवर काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटका.

1959 - भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांचा जन्म.

1987 - तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर करण्यात आलेल्या हकालपट्टीनंतर तेव्हाचे काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय समाजवादी पक्षाची स्थापना केली. हेच प्रणव मुखर्जी नंतर देशाचे राष्ट्रपती बनले

1989 - इंदिरा गांधी यांचे मारेकरी सतवंतसिंग आणि केहरसिंग यांना दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली

Next : तडकाफडकी बदली करण्यात आलेले सुनील कुमार सिंग कोण

IPS officer Transfer | Sarkarnama
येथे क्लिक करा