सरकारनामा ब्यूरो
यूपीमध्ये दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. महाकुंभमेळ्यासाठी नवीन डीआयजीची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाने जारी केलेल्या बदली आदेशात दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे.
डीआयजी वैभव कुमार कृष्णा हे आझमगड येथे तैनात होते. मात्र त्यांची तेथून बदली करण्यात आली आहे.
सुनील कुमार सिंग
आझमगडची जबाबदारी आता IPS सुनील सिंग यांना देण्यात आली.
सुनील सिंग हे आत्तापर्यंत वाहतूक पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
सुलतानपुरचे मूळ रहिवासी असलेले सुनील सिंग हे 2010 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
त्यांनी तत्वज्ञान या विषयात मास्टर डिग्री घेतली आहे.
सुनील सिंग यांच पहिल पोस्टिंग लखनऊ येथे करण्यात आलं होतं.