Sunil Balasaheb Dhumal
देवयानी खोब्रागडे या कंबोडियात भारताच्या राजदूत आहेत.
कंबोडियात नववर्षानिमित्त जल्लोष करण्यात आला.
यात देवयानी खोब्रागडे यांनी सहभाग घेत कंबोडियन लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यासाठी देवयानी यांनी ख्मेर अप्सरा'ची वेशभूषा केली होती.
राजदूत देवयानी खोब्रागडे यांना ख्मेर संस्कृती आणि परंपरेबद्दल खूप कौतुक आहे.
त्यांनी परिधान केलेला पोशाख प्राचीन ख्मेर कला आणि पौराणिक कथांमध्ये चित्रित आहे.
खोब्रागडे या 1999 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत.
आपल्या कारकिर्दीत, खोब्रागडे यांनी बर्लिन, इस्लामाबाद, रोम आणि न्यूयॉर्क येथील भारतीय मिशनमध्ये काम केले आहे.