Rashmi Mane
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.
देशातील नामांकित आर्थिक संस्थांपैकी एक असलेल्या नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अनुभवी उमेदवारांसाठी ही संधी करिअरला नवे वळण देणारी ठरू शकते.
नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना नाबार्डच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना www.nabard.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा.
ही भरती नाबार्डच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये होणार आहे. त्यामध्ये RMD, DOR, DDMMBI, DIT, DEAR अशा विभागांचा समावेश आहे. उच्च दर्जाच्या जबाबदाऱ्या आणि प्रतिष्ठा असलेली ही पदे आहेत.
नाबार्डमध्ये अॅडिशनल चीफ रिस्क मॅनेजर, रिस्क मॅनेजर, प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एक्स्पर्ट, सीनियर कन्सल्टंट, डेव्हलपर, प्रोजेक्ट मॅनेजर, फायनान्शियल अॅनालिस्ट अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1.50 लाख ते 3.85 लाख रुपये इतका पगार मिळणार आहे.