Rashmi Mane
देशातील आणखी एक भव्य पायाभूत प्रकल्प आज सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले असून, हे महाराष्ट्राच्या विकासातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे
या विमानतळाचे आर्किटेक्चरल डिझाईन कमळाच्या फुलासारखे असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाइनचा संगम येथे पाहायला मिळणार आहे.
सुमारे 19,650 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेला हे विमानतळ पुढील काही वर्षांत भारतातील प्रमुख एव्हिएशन हब ठरू शकतो.
याची वार्षिक प्रवासी क्षमता 9 कोटींहून अधिक आणि मालवाहतुकीची क्षमता 3.25 मिलियन मेट्रिक टन (MMT) इतकी असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे देशातील सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक ठरेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) हवाई वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच परिसरातील गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
इथे प्रवाशांसाठी Digi-Yatra तंत्रज्ञान लागू केले असून, त्यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पाऊस, धुक्याच्या काळात सुरक्षित लँडिंगसाठी अत्याधुनिक नॅव्हिगेशन आणि सेफ्टी सिस्टम्स बसवण्यात आल्या आहेत. हे तंत्रज्ञान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेळेच्या बचतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
पारंपरिक फूड कोर्ट ऐवजी फूड हॉल संकल्पना आणली असून, प्रवासी विविध स्टॉल्सवरून एकत्रित ऑर्डर देऊन जेवण घेऊ शकतात. स्मार्टफोनवर आधारित या डिजिटल प्रणालीमुळे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल, विशेषतः Gen-Z प्रवाशांसाठी ही सुविधा आकर्षक ठरेल.
नवी मुंबई विमानतळावर एकूण चार टर्मिनल्स आणि दोन समांतर रनवे असणार असून, सध्या फक्त एक टर्मिनल आणि एक रनवेच कार्यरत आहे. दुसऱ्या टर्मिनलच्या डिझाईन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.