Pradeep Pendhare
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालयाचे चार मोठे पायाभूत प्रकल्प मंजूर करण्यात आले.
या प्रकल्पांसाठी तब्बल 24 हजार 634 कोटी रुपये खर्च असून, यात दोन प्रकल्प महाराष्ट्राशी संबंधित आहेत.
रेल्वे मंत्रालयाचे नवे प्रकल्प महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यांतील 18 जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत.
भारतीय रेल्वेप्रणालीत 894 किमीच्या नव्या मार्गिकांचा समावेश होणार आहे.
महाराष्ट्रातील वर्धा-भुसावळ तिसरी-चौथी मार्गिका (314 किमी) तसेच गोंदिया-डोंगरगड चौथ्या मार्गिकेचा (84 किमी) समावेश असेल.
वडोदरा-रतलाम तिसरी आणि चौथी मार्गिका (259 किमी) आणि इटारसी-भोपाळ-बिना चौथी (237 किमी) आहेत.
या नव्या मार्गांमुळे दरवर्षी 78 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल, असा रेल्वे मंत्रालयाचा अंदाज आहे.
या प्रकल्पांमुळे सुमारे 3 हजार 633 गावे आणि 85 लाखांहून अधिक लोकसंख्या थेट लाभार्थी ठरणार आहे.
या प्रकल्पांमुळे दरवर्षी 28 कोटी लिटर इंधनाची बचत आणि 139 कोटी किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होईल.