Anjali Damania : नेत्यांना 'सळो की पळो' करणाऱ्या अंजली दमानिया कोण? संतोष देशमुख प्रकरणात का आहेत चर्चेत?

सरकारनामा ब्यूरो

अंजली दमानिया

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये सध्या एक नाव खुप चर्चेत आहे, ते म्हणजे अंजली दमानिया यांचं.

Anjali Damania | Sarkarnama

खळबळजनक दावा

देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानियांनी केला असून बीड पोलिसांनी याबाबत त्यांना नोटिसही पाठवली आहे.

Anjali Damania | Sarkarnama

धनंजय मुंडेंवर निशाणा

देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप केला जात असून तो मुंडेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे दमानिया यांनी मुंडेंना टार्गेट केले आहे.

Anjali Damania | Sarkarnama

बंदूकधाऱ्यांविरोधात मोहिम

दमानिया यांच्याकडून बीडमधील अनेक व्यक्तींचे हातात बंदूक घेतल्याचे फोटो सोशल मीडियात टाकले जात आहेत. त्यांनी लोकांनाही बीडमधील गुंडगिरीची माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे.

Anjali Damania | Sarkarnama

'सत्य'शोधक आंदोलन

बीडमधील गुन्हेगारीविरोधात, मुंडे जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाहीत आणि वाल्मिक कराड याला अटक होत नाही तोपर्यंत दमानियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'सत्य'शोधक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Anjali Damania | Sarkarnama

राजकारणातही होत्या सक्रिय

2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्या सक्रिय होत्या. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षातही अनेक पदे भूषवली.

Anjali Damania | Sarkarnama

कोंढाणे धरण प्रकल्प

2012 मध्ये त्यांनी आरटीआय कायद्यानुसार कोंढाणे येथील धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. यामध्ये त्यांना प्रकल्पाची किंमत ₹560 दशलक्ष इतकी होती यावरून ती ₹3.28 अब्ज पर्यंत वाढल्याच आढळून होतं.

Anjali Damania | Sarkarnama

वृद्ध महिलेला न्याय

छगन भुजबळांवर डोरिन फर्नांडिस यांच घर हाडप केल्याचा आरोप होता. दमानिया यांच्यामुळे फर्नांडिस या वृद्ध महिलेला न्याय मिळाला. यावेळी त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या.

Anjali Damania | Sarkarnama

एकनाथ खडसे

2016 मध्ये दमानिया यांनी दाऊद फोन प्रकरणावरून एकनाथ खडसे यांच्या विरोधात उपोषण करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Anjali Damania | Sarkarnama

पोलिस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली अन् धार्मिक कार्यात झोकून दिले! कोण होते Ex-IPS किशोर कुणाल?

येथे क्लिक करा...