Delhi Election 2025 : भाजपने किती वेळा काबीज केली दिल्ली?

Rashmi Mane

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 फेब्रुवारीला मतदान पार पडले. या निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होत आहे.

1993 मध्ये दिल्लीत विधानसभेची स्थापना झाली. त्याच वर्षी विधानसभा निवडणूक झाली. पहिल्याच निवडणुकीत भाजपने दिल्लीत बहुमताने सत्ता काबीज केली.

दिल्ली विधानसभेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपला तीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करावी लागली.

मदनलाल खुराणा हे भाजपचे पहिले नेते होते ज्यांनी जवळ- जवळ 27 महिने मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. यानंतर साहिब सिंग वर्मा यांनी 31 महिने मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला.

सुषमा स्वराज यांनी 52 दिवस मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या.

त्यानंतर 1998 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या ज्यामध्ये काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. शीला दिक्षीत या 2013 पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

त्यानंतर 2013 मध्ये 'आप'ने 70 पैकी 28 विधानसभा जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. काँग्रेसला 8 जागा, भाजपला 32 जागा आणि इतरांना 2 जागा मिळाल्या. आप आणि काँग्रेसने सरकार स्थापन केले.

युती सरकार फक्त 49 दिवस टिकू शकले. 2015 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा 'आप'ने 67 जागा जिंकल्या अन् भाजपला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले होते.

जवळ जवळ 27 वर्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर भाजपने आता सत्ता स्थापनेसाठी फुलप्रुफ प्लॅन बनवला आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष दिल्ली विधानसभेकडे लागले आहे.

BJP | Sarkarnama

Next : 'या' नेत्यांचे राजकीय भवितव्य EVM मध्ये बंद 

येथे क्लिक करा