Rashmi Mane
दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला.
केजरीवालांविरोधात निवडणुकीपूर्वीच वर्मा यांनी शड्डू ठोकला होता.
प्रवेश वर्मा यांना लहानपणापासूनच राजकारणाचा बाळकडू मिळाला आहे. त्यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे राजकारणात होते. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद देखील सांभाळले आहे.
प्रवेश वर्मा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी (बी.कॉम) केली आणि फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए केले आहे.
2013 मध्ये, प्रवेश वर्मा यांनी मेहरौली विधानसभा मतदारसंघातून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्री यांचा पराभव केला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून वर्मा खासदार झाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांचा 5,78,486 मतांनी पराभव केला, जो मतांमधला दिल्लीच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा फरक आहे.
2025 च्या निवडणुकीत, भाजपने त्यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी या जागेवर शानदार विजय मिळवत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.