Rashmi Mane
१८७९ - स्वातंत्र्यसेनानी, कवयित्री सरोजिनीदेवी नायडू यांचा जन्म
१९६०- फ्रान्सकडून पहिली अणूबाँबची चाचणी यशस्वी
१९८७ - एम. भक्तवत्सलम, राजकीय नेते व तत्कालीन मद्रास राज्याचे ४ थे मुख्यमंत्री यांचे निधन
१९९१- अमेरिका -इराक युद्धात बहुराष्ट्रीय फौजांचा बगदादवर हल्ला. या भीषण हल्ल्यात झोपेत असलेले सुमारे ६०० जण ठार झाले
२००३ - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
२००८- उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद उपस्थित करून प्रक्षोभक विधाने केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक. त्याच दिवशी सायंकाळी त्यांचा जामीन झाला
२०१० - पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या जर्मन बेकरीमध्ये बाँबस्फोट. १७ जणांचा मृत्यू, ६० जण जखमी
२०१२ - नवी दिल्लीत इस्त्रायली दुतावासाबाहेर मोटारीत स्फोट. पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर झाला होता हा स्फोट