Dinvishesh 14 February : काय घडलं होतं त्या वर्षी वाचा आजच्या ऐतिहासिक घटना..

Rashmi Mane

१८८१ - देशातल्या पहिल्या होमिओपॅथी महाविद्यालयाची कलकत्ता येथे स्थापना

१८९९- अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली

१९२४- संगणक तयार करणाऱ्या आयबीएम कंपनीची स्थापना

१९२५ - माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचा जन्म.

१९४५ - चिली, इक्वेडाॅर, पॅराग्वे आणि पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश

१९५० - ज्येष्ठ विधीज्ञ, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा जन्म

१९५२ - दिल्लीच्या ५ व्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री, देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्म. १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळात त्या मंत्री बनल्या होत्या

१९८९ - ईराणच्या आयातोल्ला खोमेनी यांनी ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्या खुनाचा फतवा काढला. रश्दी यांच्या द सॅटनिक व्हर्सेस या पुस्तकावरून वाद उफाळला होता

१९८९ - भोपाळमध्ये १९८४ मध्ये झालेल्या विषारी वायू दुर्घटनाग्रस्तांना अमेरिकेन बहुराष्ट्रीय कंपनी यूनियन कार्बाईडने ७१५ कोटी नुकसानभरपाई म्हणून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

२००० - अभिजित कुंटे भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर बनला

Next : पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा 'या' सात कारणांमुळे महत्त्वाचा

येथे क्लिक करा