Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ फेब्रुवारी) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ही बैठक भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.
राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत ज्यांचा भारतावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि स्थलांतराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेत आगमन होण्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा भारतीय स्टील कंपन्यांवरही परिणाम होऊ शकतो.
रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावरही परिणाम झाला आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.
पंतप्रधान मोदींची ही भेट महत्त्वाची आहे कारण ते टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्यासह अनेक प्रमुख व्यावसायिकांनाही ते भेटणार आहेत.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने 104 बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात पाठवले आहे. अमेरिकेत 18 हजारांहून अधिक भारतीय असे आहेत ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. अमेरिका लवकरच आणखी 800 लोकांना भारतात पाठवू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर कर लादले. ट्रम्प यांच्या निर्णयावर तिन्ही देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच वेळी, चीनने या निर्णयाबद्दल अमेरिकेचा उघडपणे निषेध केला आहे.