Rashmi Mane
1939 - बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे निधन. अत्यंत पुरोगामी आणि सुधारणावादी राज्यकर्ते म्हणून ते ओळखले जात. द्विभार्या प्रतिबंधक कायदा, अस्पृश्यता निवारण, बालविवाहाला बंदी अशा सुधारणा करणारे कायदे सर्वप्रथम त्यांनी अमलात आणले.
1959 - केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ऍना चंडी यांची नेमणूक. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत.
1964 - स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर यांचे निधन. महात्मा गांधी यांच्या चिटणीस म्हणून त्यांनी सोळा वर्षे काम केले होते.
1965 - पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह कैरॉं यांची हत्या. पं.नेहरूंच्या विश्वासातील नेते असणाऱ्या कैरॉं यांनी पंजाबमध्ये आधुनिक शेतीला विलक्षण गती दिली होती.
2001 - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बॅ.विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन. ते काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेही होते. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची हॅटट्रिक त्यांनी केली होती.
2003 - टाळ-मृदंगाचा मधुर आवाज, अभंगांची सजावट आणि "जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय' अशा अलौकिक आणि भारावलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा अनुभविण्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे 400 भाविक उपस्थित होते.
२०२२ - भारतरत्न, जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे निधन