Dinvishesh 9 February : काय घडलं होतं त्या वर्षी वाचा आजच्या ऐतिहासिक घटना..

Rashmi Mane

1929 - महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सिमेंट गैरव्यवहारात आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Dinvishesh 9 February | Sarkarnama

1933 - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना "श्‍यामची आई" या पुस्तकाच्या लेखनाला सुरवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांपेक्षा अधिक प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत.

Dinvishesh 9 February | Sarkarnama

1951 - स्वतंत्र भारतातील पहिल्या जनगणनेचे काम सुरु. या जनगणनेपासून जातवार नोंदी रद्द केल्या गेल्या.

Dinvishesh 9 February | Sarkarnama

1969 - बोईंग ७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण

Dinvishesh 9 February | Sarkarnama

1981 - नामवंत कायदेपंडित न्या.एम.सी.छगला यांचे निधन. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश, कुलगुरु, शिक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशा अनेक प्रकारे त्यांनी आपला ठसा उमटविला होता.

Dinvishesh 9 February | Sarkarnama

2002 - संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या देशातील पहिल्याच क्रायोजेनिक इंजनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या "लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिम्स सेंटर' मध्ये (एलपीएससी) या इंजिनाची बांधणी करण्यात आली आहे.

Dinvishesh 9 February | Sarkarnama

2008 - कुष्ठरुग्णांसाठी मोठे कार्य करणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन

Dinvishesh 9 February | Sarkarnama

Next : केजरीवालांना धोबीपछाड देणारे 'जायंट किलर' प्रवेश वर्मा

येथे क्लिक करा