Rashmi Mane
1896 - महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, पंजाबचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, लेखक व प्रभावी वक्ते नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म.
1900 - महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार ऊर्फ दादासाहेब सांबाशिवपत यांचा जन्म.
1922- मधुमेहावर उपचार करण्यासाठी इन्सुलिनचा प्रथम वापर
1946 - संयुक्त राष्ट्राच्या (युनो) महासभेचे पहिले अधिवेशन. लंडनमध्ये झालेल्या या अधिवेशनाला 51 देशांचे प्रतिनिधी हजर होते.
1987 - पंजाबात खलिस्तानी अतिरेकी कारवायांचा उद्रेक खलिस्तान कमांडो फोर्सकडून पंजाबचे तत्कालीन तुरूंग महानिरिक्षक टी. सी. कटोच यांची गोळ्या घालून हत्या
1993 - बाबरी मशिद पाडल्यानंतर अटक करण्यात आलेले भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांची बिनशर्त सुटका करण्याचा न्यायालयाचा आदेश
2001 - दारिद्र्यरेषेवरील लोकांना रेशनवर साखर न देण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय
2003 - "बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे' या ब्रिटिशकालीन कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक 133 वर्षांचे झाले. हे स्थानक 1870 मध्ये उभारण्यात आले. त्या वेळी केवळ एक फलाट होता.
Next : दिवसा नोकरी अन् रात्री परीक्षेची तयारी; UPSC मध्ये टॉप करत रचला इतिहास