Dinvishesh 14 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1882 - समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे ते चिरंजीव.

Dinvishesh 14 January | Sarkarnama

1892 - क्रिकेटमहर्षी श्री. दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. 1965 मध्ये भारत सरकारतर्फे त्यांना "पद्मश्री' आणि 1991 मध्ये "पद्मभूषण' किताबाने सन्मानित करण्यात आले.

Dinvishesh 14 January | Sarkarnama

1896 - भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांचा जन्म. रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

Dinvishesh 14 January | Sarkarnama

1995 - केंद्र सरकारने जाहीर केला विश्व हिंदू परिषदेवर बंदी घालण्याचा निर्णय

Dinvishesh 14 January | Sarkarnama

1998 - आपल्या दर्जेदार आणि भावपूर्ण गायनाने लाखो श्रोत्यांच्या मनात मानाचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना "भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान जाहीर.

Dinvishesh 14 January | Sarkarnama

1999 - तिरुअनंतपुरम येथील शबरीमला टेकडीवर अय्यप्पा स्वामींचे देवस्थान असलेल्या पंबा टेकडीचा काही भाग खचल्यामुळे 51 भाविक मृत्युमुखी तर शंभरावर जखमी.

Dinvishesh 14 January | Sarkarnama

2000 - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा ऊर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना 1999 चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

Dinvishesh 14 January | Sarkarnama

2005 : ‘कॅसिनी’ यानापासून वेगळी झालेली ‘ह्युजेन्स’ अंतराळकुपी पॅराशूटच्या साह्याने यशस्वीरीत्या ‘टायटन’ या शनीच्या सर्वांत मोठ्या चंद्रावर उतरली.

Dinvishesh 14 January | Sarkarnama

Next : ऐतिहासिक महाकुंभ मेळ्याची संपूर्ण जबाबदारी आहे 'या' IAS अधिकाऱ्यावर! योगींचे विश्वासू म्हणून ओळख...

येथे क्लिक करा