Rajanand More
आयएएस विजय किरण आनंद हे 2009 च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. बेंगलुरू येथे जन्मलेल्या विजय आनंद यांनी उत्तर प्रदेशात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
विजय आनंद यांच्यावर महाकुंभ मेळ्यासाठी संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली आहे. महाकुंभ मेळ्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाकुंभ मेळ्यासाठी महाकुंभ मेळा हा नवीन जिल्ह्याची तात्पुरती निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये चार तालुके आणि 67 गावांचा समावेश आहे. विजय आनंद हे या जिल्ह्याचे प्रमुख आहेत.
विजय आनंद यांनी यापूर्वी 2017 तील माघ मेळा आणि 2019 मध्ये कुंभ मेळा यशस्वीपणे पार पडण्याची महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ते विश्वासू बनले.
विजय आनंद यांनी विविध पदांवर केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे ते योगी आदित्यनाथ यांचे विश्वास अधिकारी बनले आहेत.
महाकुंभ मेळ्याची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून भाविकांसाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यामध्ये विजय आनंद यांचा अनुभव आणि कुशलता कामी येत आहे.
नियोजन
महाकुंभ मेळा 45 दिवस चालणार असून सुमारे 45 कोटी भाविक या मेळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नियोजनाच्यादृष्टीने प्रशासनासमोर मोठे आव्हान असेल.
विजय आनंद यांची आयएएस म्हणून पहिली नियुक्ती बागपत जिह्यात एसडीएम म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी बाराबंकी मध्ये सीडीओ आणि गोरखपूर, वाराणसी, उन्नाव अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.