Dinvishesh 24 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1943- पुण्याच्या कॅपिटॉल चित्रपटगृहात बाबुराव चव्हाण, बापू साळवी, एस. टी. कुलकर्णी आणि भास्कर कर्णिक या चार क्रांतीवीरांनी बाँबस्फोट घडवला. त्यात ४ इंग्रज अधिकारी ठार झाले होते. ही इमारत आता व्हिक्टरी या नावाने ओळखली जाते.

Dinvishesh 24 January | Sarkarnama

1950 - भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांची निवड. याच दिवशी "जन गण मन' हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.

Dinvishesh 24 January | Sarkarnama

1962 - विशिष्ट माध्यम लावण्याचा गुजरात विद्यापीठास अधिकार नाही, असा गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय. गुजराती माध्यमाची सक्ती करणारा कायदा रद्द.

Dinvishesh 24 January | Sarkarnama

1965 - दुसऱ्या महायुद्धातील विजयाचे शिल्पकार व माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचे निधन.

Dinvishesh 24 January | Sarkarnama

1966 - एअर इंडियाचे "कांचनगंगा' विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळले. या अपघातात भारतातील अणू विज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी भाभा यांचे निधन झाले.

Dinvishesh 24 January | Sarkarnama

1998 - प्रजासत्ताकदिनी आणि निवडणूक प्रचारादरम्यान घातपाती कारवाया घडवून आणण्याकरिता पाकिस्तानातील सात जणांनी 45 दिवस भारतीय सीमेच्या आतील भागात भुयार खणल्याचे उघडकीस आले. हे भुयार 55 मीटर लांब आणि पाऊण मीटर रुंद होते.

Dinvishesh 24 January | Sarkarnama

2002 - तिसऱ्या पिढीतील इन्सॅट-3 सी या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरु अवकाशतळावरुन एरिअन-4 या उपग्रहवाहकाद्वारे यशस्वी प्रक्षेपण.

Dinvishesh 24 January | Sarkarnama

Next : गुमनाम बाबाच होते सुभाषचंद्र बोस, काय आहे सत्य 

येथे क्लिक करा