सरकारनामा ब्यूरो
23 जानेवारीला चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 128 वी जयंती आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी...
1939 ला उत्तर प्रदेश मधील मकनैर उन्नव येथे सुभाषचंद्र बोस यांनी 'ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची' स्थापना केली. यात अनेक ब्रिटिश राजवटी विरोधात कारवाई करण्यात आल्या होत्या.
सुभाषचंद्र बोस यांनी 'द इंडियन स्ट्रगल' हे पुस्तक लिहिले यामध्ये 1920 ते 1942 ला झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 'भारत छोड़ो' ,'आझाद हिंद सेना' या आंदोलनातील घटनांचा समावेश असल्याने या पुस्तकावर ब्रिटीशांनी बंदी घातली होती.
1943 ला सिंगापूरमध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र भारताच्या 'हंगामी सरकार'चे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस होते.
बोस हे Indian National Army (INA) आझाद हिंद सैनेचे कमांडर इन चीफ होते.
1942 ला 'जय हिंद' ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली.
सुभाषचंद्र बोस यांचे निधन विमान दुर्घटनेमध्ये झाले. मात्र, असा दावा केला जातो की उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्हामध्ये राहणारे गुमनाम बाबा हे सुभाषचंद्र बोस आहेत.
गुमनाम बाबांकडे असलेल्या साहित्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या परिवाराच्या फोटोचा समावेश होता.
गुमना बाबांकडे बोस कुटुंबीयांचे फोटो तसेच इतर साहित्यामुळे तेच सुभाषचंद्र बोस असल्याचा दावा केला जातो आहे. मात्र, पुराव्यानिशी ते अजुनही सिद्ध झालेले नाही.