Rashmi Mane
1865 - पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाणारे आणि लाल, बाल, पाल या त्रयींतील लाला लजपतराय यांचा जन्म. सायमन कमिशनच्या विरोधातील निदर्शनांच्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यातील मारामुळे त्यांना मृत्यू आला.
1900 - भारताचे पहिले सरसेनापती जनरल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. दुसऱ्या महायुद्धात ब्रिगेडचे नेतृत्व करणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. पुढे त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद देण्यात आले.
1925 - विख्यात शास्त्रज्ञ व अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म.
1961 - एचएमटी या भारतातल्या पहिला घड्याळ कारखाना बंगळूरमध्ये सुरु
1984 - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सोहराब मोदी यांचे निधन.
1996 - समाजवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवकांत बारूआ यांचे निधन. १९७३ ते १९७७ या काळात ते काँग्रेस (आय) चे अध्यक्ष होते.
1998 - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सर्व २६ आरोपींना फाशीची शिक्षा. राजीव गांधी यांच २१ मे १९९१ रोजी श्रीपंरूपुदूर येथे बाँबस्फोटात हत्या करण्यात आली होती.
1999 - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठाचा "देशिकोत्तम' हा सर्वोच्च सन्मान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना प्रदान.