Dinvishesh 7 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1972 - कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले

1980 - आणीबाणीनंतरच्या जनता सरकारच्या पतनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांत इंदिरा गांधींची मुसंडी

1989 - जपानचे सम्राट हिरोहितो यांचे निधन. यांच्या कारकिर्दीत जपान आधुनिक आणि बलाढ्य लष्करी देश झाला. त्यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती, की महायुद्धात जपानने शरणागती पत्करल्यावरही त्यांना युद्धगुन्हेगार ठरविण्याला किंवा पदच्युत करण्याला दोस्त राष्ट्रे धजावली नाहीत.

1992 - मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट जारी.

1994 - आयुर्विमा महामंडळाच्या खासगीकरणाची शिफारस मल्होत्रा समितीने तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग सरकारला केली.

2000 - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आपले अवघे आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.

2001 - 210 मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकडून 40 महिन्यांत पूर्ण.

2022 - कोविड १९..कोविडच्या साथीचा धुमाकूळ सुरू जगभरात ३० करोड पेक्षा जास्त लोकांना कोरोना साथीची लागण

Next : भारताच्या 'या' सहा राष्ट्रपतींना करण्यात आले 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित

येथे क्लिक करा