Rashmi Mane
1893 - आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म
1898 - प्रसिद्ध शास्त्रज्ञ मेरी क्यूरीद्वारा 1898 मध्ये रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध.
1914 - कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म. त्यांनी "आनंदवन', "सोमनाथ', "अशोकवन' इ. प्रकल्प उभारून अंध, अपंग, कुष्ठरुग्णांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली.
1997 - पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा काँग्रेसला धक्का.
1999 - नेहरूंच्या जमान्यातील कॉंग्रेस नेते व माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे निधन.
2003- इराणमध्ये भूकंपाचा भीषण धक्का. ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे प्रचंड मनुष्यहानी
2004 - इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ झालेला भूकंप आणि त्यामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा भारताची दक्षिण किनारपट्टी व श्रीलंकेसह हिंदी महासागरातील मोठ्या टापूत बसलेला फटका यांमुळे साडेआठ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. सुमात्रा बेटांत केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता 8.9 रिश्टर होती. त्यामुळे त्सुनामी येऊन हाहाकार उडाला.
2011- कर्नाटकचे १५ मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे निधन
2015 - विमाक्षेत्रात परकी गुंतवणूक आणि कोळसा खाणवाटपात पारदर्शीपणा येण्यासाठी ई-लिलाव करण्यासंदर्भातील अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली.
Next : अमेरिकेने सर्वाधिक वेळा नाकारला 'या' देशांचे व्हिसा