Rashmi Mane
जागतिक जैविक विविधता दिन
1844 - अ. भा. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म. सुरेंद्रनाथ बॅनर्जींवरील 1883 च्या न्यायालयीन बेअदबीच्या खटल्यात त्यांनी सुरेंद्रनाथांचा बचाव केला. स्थायी कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
1900 - गायक नट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म. त्यांच्या पुण्यप्रभाव, भावबंधन, मानापमान, संन्यस्तखड्ग, ब्रह्मकुमारी इ.नाटकांतील स्त्री-पुरुष भूमिका व त्यांची वेगवेगळ्या शैलीची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली.
1917 - "रामायण' मालिकेमुळे घराघरात पोचलेले प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रामानंद सागर यांचा जन्म. भारतीय संस्कृती-परंपरा आणि त्यातील आदर्श नैतिक मूल्ये "रामायण'या महाकाव्याच्या दृक्श्राव्य सादरीकरणातून घराघरात पोचवताना रामानंद सागर यांनी जी किमया केली, ती अक्षरशः अवाक करणारी होती.
1971 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन
1994 - माझगाव डॉक लिमिटेडने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका "आयएनएस-नाशक' समारंभपूर्वक नौदलात दाखल.
1998 - गृहनिर्माण प्रकल्प व अन्य प्रकल्पांसाठी अतिरिक्त जमिनीचा विकास करण्याच्या हेतूने कमाल जमीन धारणा कायदा (1976) रद्द करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
2000 - 1971 मध्ये श्रीनगरहून जम्मूकडे जाणाऱ्या विमानाचे अपहरण केल्याच्या कटाचा सूत्रधार हाशीम कुरेशीची भारतासमोर अचानक शरणागती. तब्बल तीस वर्षांनंतर आला शरण