Jagdish Patil
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं. एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांची पत्नी गुरशरण कौर आणि मुलगी दमन सिंग यांनी अंतिम दर्शन घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी सिंग यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.
सोनिया गांधी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.
मनमोहन सिंग यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात दर्शनासाठी ठेवलं होतं.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना राहुल गांधी.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना प्रियांका गांधी.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी देखील सिंग यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.