Jagdish Patil
१८५७ - मुंबईत कला शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसची स्थापना.
१९३१- सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष नोबेल पुरस्कार विजेतो मिखाइल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.
१९४९ - प्रभावी वक्त्या, कवयित्री आणि स्वातंत्र्यसेनाने सरोजिनीदेवी नायडू यांचे निधन.
१९५६ - मोरोक्कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६९ - ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या काँकॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण.
१९७८ - स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतून विख्यात विनोदवीर चार्ली चॅप्लिन यांच्या शवपेटीकेची चोरी.
२००१ - मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या सहाय्याने बामियाँमधील प्राचीन बुद्ध मूर्ती उध्वस्त करायला सुरूवात केली.