Deepak Kulkarni
मूळच्या हरियाणातील रोहतकच्या असलेल्या अमृता दुहान यांनी यांची कारकीर्द एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे.
अमृता दुहान या 2016 बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्यांची दबंग अधिकारी म्हणून ओळख आहे.
राजस्थान केडरच्या 'लेडी दबंग' आयपीएस अधिकारी अमृता दुहान यांचा डॉक्टर ते आयपीएस अधिकारीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास असाच राहिला आहे.
त्यांनी 'एमबीबीएस'नंतर पॅथॉलॉजीमध्ये 'एमडी'पर्यंतचं शिक्षण पूर्ण करतानाच सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयपीएस व्हायचे स्वप्न पूर्ण केले. धाकट्या भावाची आयपीएससाठी निवड झाली, तेव्हा तिला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा (सीएसई) देण्याची प्रेरणा मिळाली.
सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच त्यांचे लग्न झाले,त्यानंतर त्यांना समर नावाचा मुलगा झाला.
पण दिवसरात्र मेहनत, कौटुंंबिक जबाबदारी सांभाळत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर 2016 मध्ये कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
बिनधास्त आणि तडफदार कार्यपध्दतीमुळे राजस्थानमध्ये त्यांनी वेगळी छाप पाडली आहे.