Jagdish Patil
१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिन.
१४९३ - भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१५६४ - मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.
१६८० - छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
१९०६ - रोल्स रॉईस कंपनीची स्थापना.
१९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
१९६१ - ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
२००३ - हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी.