Jagdish Patil
२७ मार्च - जागतिक रंगभूमी दिन.
२००० - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे 'राष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर
१९९२ - पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा 'तानसेन पुरस्कार' प्रदान.
१९६६ - २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत 'पिकल्स' नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर पुन्हा १९८३ मध्ये तो चोरीला गेला, ते अद्याप सापडलेला नाही.
१९५८ - निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१८५४ - क्रिमियन युद्ध - इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१७९४ - अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
१६६७ - शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्यांचा महंमद कुली खान झाला.