Jagdish Patil
आरिफ शेख हे 2005 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. सुरुवातीला त्यांचं केडर मणिपूर होतं. त्यानंतर ते छत्तीसगड केडरला आले.
महादेव बेटिंग ॲप, दारू घोटाळा आणि कोळसा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये सीबीआयने त्यांच्या घरावर छापेमारी केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय अशी IPS शेख यांची ओळख आहे.
शेख यांनी 2004 मध्ये संपूर्ण भारतात 94 वी रँक मिळवत UPSC क्रॅक केली. त्यानंतर त्यांची IPS पदी निवड झाली.
शेख हे मूळचे महाराष्ट्रातील असून मुंबईच्या सेंट लॉरेन्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे.
त्यांनी अकरावी-बारावीचं शिक्षण आणि आणि इंजिनीअरिंगची पदवी पुण्यातून घेतली आहे.
त्यांचे वडिलही महाराष्ट्र पोलिसांत इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचं बालपण पोलिस वातावरणात गेले. 3 भावंडांमध्ये ते सर्वात मोठे आहेत.