Rashmi Mane
महाराष्ट्रात 2 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका होत आहेत. लोकशाहीत प्रत्येक मताचं वजन किती मोठं असतं, हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
मतदान हा फक्त हक्क नाही, तर आपल्या परिसराच्या विकासाचा पाया ठरवणारी जबाबदारी आहे. योग्य प्रतिनिधी निवडण्याची ही लोकशाहीने दिलेली मौल्यवान संधी आहे.
जगभरात अनेकदा केवळ एका मताच्या फरकाने सरकार कोसळली आहेत.
1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत होतं. अनेक मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या या सरकारवर एआयएडीएमकेने पाठिंबा काढून घेतल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाची वेळ आली. संसदेत झालेल्या मतदानात सरकारला 269 मतं मिळाली, तर विरोधकांना 270. एका मताच्या फरकाने वाजपेयी सरकार कोसळलं. या घटनेनं एका मताची ताकद नेमकी किती, हे दाखवून दिलं.
1795 मध्ये अमेरिकेची पहिली भाषा ठरवण्यासाठी मतदान झालं. इंग्रजीला जर्मनपेक्षा फक्त एका मतानं आघाडी मिळाली आणि इंग्रजी राष्ट्रीय भाषा ठरली. एका मतानं देशाची भाषा ठरली!
1980 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदमांचा अवघ्या 86 पोस्टल मतांनी पराभव झाला. थोड्याशा मतांनी संपूर्ण राजकीय चित्र बदलू शकतं.
1917 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक एका मताने हरले. भविष्यात भारताचे ‘लोहपुरुष’ बनणारे नेते येथे एका मताने पराभव झाला होता.
इतिहास सांगतो एका मताने देश, सरकार आणि भविष्य बदलतं. त्यामुळे 2 डिसेंबरला मतदान करून लोकशाही बळकट करा. तुमचं मत उद्याचा मार्ग ठरवू शकतं!