Roshan More
नगर परिषद, नगरपंचायतीसाठी उद्या (मंगळवारी) मतदान होत आहे.
मतदानाच्या दिवशी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छे १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाट भरपगारी सुट्टी देण्यात येते.
जेथे पूर्ण दिवस सुट्टी देता येत नाही. त्या ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्याची तरदूत असते.
काही ठिकाणी कामागरांना भरपगारी सुट्टी देण्यात येत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या दिवशीची सुट्टी ही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल. यामध्ये खाजगी कंपन्या हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा देखील समावेश असणार आहे.
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे देखील आदेशात म्हटले आहे.