Vijaykumar Dudhale
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले. भाषणाचा मुख्य रोख हा अर्थसंकल्पातील घोषणांवर होता.
अजित पवार यांनी भाषणात ‘माझी लाडकी बहिण योजने’वर सर्वाधिक फोकस ठेवला.
चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना दर महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये मिळणार
लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये येत्या ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे, त्या कुटुंबातील दोन महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे.
माझी लाडकी बहिण योजनेतून एकट्या बारामती तालुक्याला वर्षाला 180 कोटी रुपये मिळणार आहेत
माझी लाडकी बहिण योजना सुरू राहण्यासाठी महायुती सरकारला निवडून द्या, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले
अर्थसंकल्पातील विविध योजनांचा जनसन्मान रॅलीत पुन्हा पाऊस पाडून अजित पवारांनी बारामतीतून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले