Jagdish Patil
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
दिशाने आत्महत्या केली नव्हती, तर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे.
या याचिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंसह इतर बॉलीवुड कलाकारांना अटक करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या उडुपी इथे जन्मलेली दिशा सालियन ही सेलिब्रिटी मॅनेजर होती.
तिने सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या कलाकारांबरोबर काम केलं होतं.
ती अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता.
9 जून 2020 रोजी दिशाचा मुंबईतील मालाड मधील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.
दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशीही जोडण्यात आलं. कारण तिच्या मृत्यूनंतर 5 दिवसांनी सुशांतने आत्महत्या केली.
मात्र, CBI ने दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही आता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.