Roshan More
राहुल नार्वेकर 10 जानेवारीला 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निकाल देण्याची शक्यता आहे. या 16 आमदारांपैकी तब्बल 6 जण मराठवाड्यातील आहेत.
भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार, मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला सुरुवातीपासूनच साथ दिली.
अब्दुल सत्तार हे ठाकरेंसोबत राहतील असे वाटले होते. मात्र, त्यांनी देखील एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले. शिंदेंच्या मंत्रीमंडळात ते आता मंत्री आहेत.
संजय शिरसाट यांनी बंडात एकनाथ शिंदेंना साथ दिली. मंत्रीपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र, त्यांना मंत्रीपद मिळाले नाही.
मराठवाड्यातील वैजापूर मतदारसंघाचे आमदार प्रा.रमेश बोरणारे यांनी देखील शिंदेंना साथ दिली.
नांदेड उत्तरमधून विजयी झालेले बालाजी कल्याणकर यांनी देखील ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात जाणे पसंत केले.
मराठवाड्यातील पैठणचे आमदार संदीपान भुमरे शिंदेच्या मंत्रीमंडळात मंत्री आहेत.
उद्धव ठाकरे गटातील नेते निर्णय त्यांच्याच बाजुने लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.