Akshay Sabale
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानकांचं उद्घाटन पार पडलं.
त्यानिमित्त जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोचे तिकीट किती असेल? प्रश्न सर्वांना पडला असेल. त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ या मार्गाचे तिकीट 10 रूपये असणार आहे.
जिल्हा न्यायालय ते मंडईपर्यंत जाण्यासाठी 15 रूपये तिकीट आकारण्यात येणार आहे.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेटला जाण्यासाठी 15 रूपये तिकीट आकारण्यात येईल.
स्वारगेट ते मंडईसाठी 10 रूपये तिकीट आकारलं जाणार आहे.
स्वारगेट ते कसबा पेठसाठी 15 रूपये तिकीट आकारण्यात येईल.
स्वारगेट ते जिल्हा न्यायालयापर्यंत येण्यासाठी 15 रूपये तिकीट आकारलं जाणार आहे.