सरकारनामा ब्यूरो
तिरुअनंतपुरमच्या दिव्या अय्यर या केरळ केडरच्या IAS अधिकारी आहेत.
त्रिवेंद्रम येथील सेंट थॉमस सेंट्रल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले.
वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी 'एमबीबीएस'ची पदवी संपादन केली.
'एमबीबीएस' पूर्ण केल्यानंतर त्याच क्षेत्रात नोकरी करत त्यांनी 'यूपीएससी'ची परीक्षा दिली.
2014 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी 48 वा 'रँक' मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मिशनच्या 'डायरेक्टर' पदावर त्यांनी काम केले.
कोरोना काळात 'ब्रेक द चेन' जागरूकता मेहिमेत केरळ येथील 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी त्या एक आहेत.
अधिकारीपदा व्यतिरिक्त त्यांनी वैद्यकीय आणि कलाकार क्षेत्रातही उत्तम कारकीर्द गाजवली आहे.
'सोशल मीडियावरील फेमस' आणि लोकप्रिय 'आयएएस' पैकी दिव्या या एक आहेत.